“नेतृत्व म्हणजे सत्ता नव्हे… नेतृत्व म्हणजे प्रत्येकाच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि विकासासाठी खंबीरपणे उभं राहणं.” - ॲड. विशाल मुरलीधर जाधव

फेसबुक फॉलो करा

फेसबुक पेज च्या माध्यमातून जनसामान्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न

इंस्टाग्राम फॉलो करा

इंस्टाग्राम पेज च्या माध्यमातून जनसामान्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न

युट्यूब सबस्क्राइब करा

युट्यूब चॅनल च्या माध्यमातून जनसामान्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न

“काम हेच ओळख, विकास हेच ध्येय”

Adv Vishal Jadhav

नाव: ॲड. विशाल मुरलीधर जाधव

नमस्कार, मी ॲड. विशाल मुरलीधर जाधव एक सर्वसामान्य शेतकरी घरातील मुलगा सर्वसामान्य कुटुंब तेथे कष्टाने आणि हलाकीच्या दिवसात आई-वडिलांच्या आशीर्वादाने कष्ट करत करत उच्चशिक्षित म्हणजेच बी ए एल बी (वकील) हे शिक्षण पूर्ण केलं. तसा आपला चिखली जाधववाडी परिसर विकसित होत होता. समाविष्ट गावांना न्याय मिळावा आणि आपल्या परिसराचा विकास यासाठी मी माझ्या कार्याला सुरुवात माननीय अजित दादा पवार यांच्या कामाला प्रेरित होऊन मी २०१० साली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा वॉर्ड अध्यक्ष म्हणून माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. पुढे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळण्यात मी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. वकील व्यवसायातून यासाठी लढताना राजकारणातून समाजाशी नाळ जिडताना विकासाला प्राधान्य दिले. लोकाभिमुख भूमिका घेणे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखणे हे माझ्यासाठी नेहमीच महत्वाचे राहिले आहे.

प्रभागातील कोणतीही समस्या असो—रस्ते, वीज, पायाभूत सुविधा, परंपरा किंवा सामाजिक प्रश्न—सोडवण्यासाठी मी नेहमीच ठामपणे उभा राहिलो आहे. शिव रस्त्याचा पूर्व पाठपुरावा केला, विजेच्या समस्येवर मोर्चा काढला. रस्त्यावरील खड्ड्यांसाठी अभिनव आंदोलन केले. कोविड काळात मोफत लसीकरण केले. संघर्ष युद्ध म्हणुन डॉक्टरांचा सन्मान केला. गेली पंधरा वर्षे मी अखंडपणे समाजासाठी काम करत आलो या सेवेमुळे मला हजारो नागरिकांचा आत्मिक विश्वास मिळाला आहे. माझा हा प्रवास अधिक बळकट होत असून यापुढे मी माझ्या प्रभागासाठी आणि जनतेसाठी तितकाच समर्पित काम करीत राहणार आहे. त्याचबरोबर वकिली व्यवसाय करत असताना बांधकाम व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय यामुळे विविध तरुणांना रोजगार उपलब्ध करून अनेक कुटुंबे उभी करण्याची संधी मला यामुळे मिळाली म्हणुनच तरुणांसाठी अश्याच नवनवीन व्यवसायाच्या संधी व नोकरीची संधी उपलब्ध करून देता आल्या.

आणि हाच माझ्या कार्याला सहकार्य करत. महिलांसाठी विशेष उपक्रम राबवण्यासाठी माझ्या पावलावर पाऊल ठेवत माझी पत्नी सौ. शुभांगी विशाल जाधव हिने देखील सहकार्य केले. श्री महालक्ष्मी महिला बचत गट स्थापन करून महिलांना बचतीची आणि मोठ्या आणि घरगुती उद्योगाची माहिती व आर्थिक भांडवल उभा करण्यासाठी मदत केली. महिलांना समोर आणण्यासाठी महिलांसाठी हळदीकुंकू, होम मिनिस्टर आणि मशीन क्लास असे उपक्रम राबवले. पूर्ण प्रभाग हेच आमचे कुटुंब समजून प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रभागाच्या विकासात कायम आघाडीवर असतो. यापुढे देखील प्रभागातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

समाजकारणाचा मार्ग राजकारणातून जातो म्हणुन मी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक लवकरच पार पाडणार आहे. या निवडणुकीत आपल्या समोर येत आहे याआधी देखील आपण मला कायम आशीर्वाद देत आला आहात आणि यापुढेही देत राहा ही अपेक्षा व्यक्त करतो.

सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी.

249018236_4470727563042170_4556260453757662401_n
IMG_1631
WhatsApp Image 2021-12-11 at 8.14.38 PM (1)
WhatsApp Image 2021-12-11 at 8.01.17 PM
WWHH1208
a96d0880-44b3-4340-89fd-607ac8c81b67
253715779_4470727683042158_8615695783471211200_n
2d12ec35-0e9c-4b84-a5b6-64863964e340

आपल्यासाठी सदैव तत्पर

प्रभागातील कोणतीही समस्या, तक्रार, सूचना किंवा मदतीची गरज असल्यास— ॲड. विशाल जाधव साहेब आणि टीम नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे.